राज्यात दुष्काळ असतांना यांना राम मंदिर आठवते, सरकार खोटे, खोटी आश्वासने - राज ठाकरे

बुधवार, 24 ऑक्टोबर 2018 (16:05 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वणी च्या पदाधिकारी मेळावातील सम्पूर्ण भाषण वाचा. राज यांनी पुन्हा सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुष्काळ, पाणी प्रश्न, शेतकरी प्रश्न सोबतच सरकारची खोटे दावे यावर राज यांनी पुन्हा हल्ला केला. शिवसेनेवर टीका केली असून राजीनामे खिशातच राहिले का ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. राज यांचे पूर्ण भाषण. 
 
राज्यात दुष्काळ असतांना यांना राम मंदिर आठवते जमिनीला भेगा पडल्या तिकडे लक्ष कोण देणार,काल पर्यंत काँग्रेस ला विकास केला नाही म्हणून शिव्या घालत होती आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वाले सुध्दा तसेच आहेत दांभिक, ढोंगी खोट बोलणारे, काल परवा दसरा मेळावा झाला मात्र आज राज्यात 180 तालुक्यात दुष्काळ आहे आणि यांना राममंदिर आठवते जमिनीला भेगा पडत आहे पाऊस कमी आहे आणि अनेक ठिकाणी लोक स्थलांतर करू लागले आहे. नरेंद्र मोदी सांगतात आम्ही दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ, सरकार खोटे आहे मुख्यमंत्री खोटे बोलतात 
 
काल नरेंद्र मोदी म्हणाले दीड कोटी घरे दिले कुठं आहेत घरे असा प्रश्न आहे. नरेंद्र मोदी गुजरात गुजरात करतात तेव्हा चालते मी मराठी मराठी म्हटले तर राज ठाकरे संकुचित असे म्हटले जाते.
 
उद्धव ठाकरे हे सरकार मध्ये असले तरी करण्यासाठी सत्तेत आहे असे म्हणतात त्याच्या मंत्री यांनी राजीनामे दिले पाहिजे मात्र ते देत नाही ,राज ठाकरेजनावरांची हाडे निघाली त्यानां जवरणा खायला चारा नाही मात्र यांना दुसरच दिसते त्यामुळे आता राज्यात अगोदर चे नको आणि आत्ताचेही नको एक दिवस महाराष्ट्र ने राज्याची सत्ता देऊन बघा नाशिकचा पाच वर्षात जो विकास केला तो कुणी 25 वर्षात केला नाही, खोट नाही बोलत बसलो मुख्यमंत्री सारखा 1 लाख 25 हजार विहिरी बांधल्या म्हणतात पाणी एकही विहिरी ला नाही येथे विहिरीचं नाही असेही त्यानीं म्हटले 
काही माध्यमातून खोटं सांगितले जाते खऱ्या बातम्या येऊ दिल्या जात नाही, खोट बोलणाऱ्या राजकीय पक्षाला लोकांनी दूर सारल पाहिजे. नरेंद्र मोदी सांगतात आम्ही 2 कोटी रोजगार देऊ कालच ते थाप मारून गेले नरेंद मोदी म्हणाले आम्ही दीड कोटी घर बांधली आता ती शोधायची कुठे असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
 
तसेच सरकार कसे खोटे बोलते याचे उदाहरण म्हणून वणी ला मनसे कडून 100 कोटी जाहीर करतो असे म्हणून सरकार कसे खोटे बोलते याचे उदाहरण सांगितले कोट्यावधी मध्ये आकडे सांगितले की लोक टाळ्या वाजवणे सुरू करतात फक्त आकडे फेकले जातात सत्यात कुठल्या गोष्टी उतरत नाही जलयुक्त शिवारचा बोजवारा उडाला आहे.
 
काल cbi च्या अधिकारी यांच्या 2 कोटी घेतल्याचा गुन्हा दाखल cbi ने cbi च्या संचालक वर गुन्हा दाखल केला हे अधिकारी कोण गुजरात कॅडर चे आणला कोणी नरेंद मोदी यांनी, नरेंद्र मोदी गुजरात गुजरात करतात तेव्हा चालत जेव्हा राज ठाकरे मराठी मराठी मराठी केले तर राज ठाकरे संकुचित जातीयवादी म्हटले जाते असाही आरोप राज ठाकरे यांनी केला
 
इतके खोत बोलणारे सरकार मी अजून बघितले नाही. असेही त्यानी म्हटले. काही वर्षांपूर्वी नागपूर येथे आपल्या मागण्यांसाठी एकत्र आलेले गोवारी हुतात्मा झाले मात्र आजही गोवारी समाजाचा प्रश्न निकाली निघाला नाही. शिवसेना सांगते आम्हाला सरकार कडून काम करून घ्यायचे म्हणून आम्ही सरकार मधून बाहेर पडत नाही, त्यांची पैशाची कामे असली तर सरकार मधून बाहेर पडायच्या धमक्या द्यायच्या आणि हजारो कोटी ची कामे झाले की परत राजीनामे खिशात ठेवतात असची टोला त्यानी लगावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती