निवडणुकीसाठी फंड तो जमवण्यासाठीच ही प्लास्टिकबंदी लागू - राज ठाकरे

मंगळवार, 26 जून 2018 (17:18 IST)
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारव निशाना साधला आहे. राज यांनी आज पत्रकार परिषदेत प्लास्टिक बंदीवर जोरदार टीका केली आहे. राज म्हणाले की जर एखाद्याला आलेला झटका, हे देशाचं किंवा राज्याचं धोरण ठरू शकत नाही. सरकारने कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता राज्यात प्लास्टिकबंदी केली, व नागरिकांकडून दंड आकारणं साफ चुकीचं आहे.
 
सरकारच्या नाकर्तेपणाचा दंड जनतेला कशासाठी? का करत आहात असा प्रश्न राज यांनी उभा केला आहे. मनसे प्रमुख  राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज यांनी आरोप केला आहे की प्लास्टिक उत्पादकांकडून निवडणुकीसाठी फंड मागण्यात आला होता आणि तो जमवण्यासाठीच ही प्लास्टिकबंदी लागू करण्यात आलीय असेही यांनी सांगितले आहे.
 
मुंबई काय कोणत्याही शहरात कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था नाही. 
जोपर्यंत सर्व सुविधा मिळत नाही, तोपर्यंत दंड देऊ नका, असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलं आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा की एका खात्याचा हेच मला समजत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयात तातडीनं लक्ष घातलं पाहिजे, असं सल्लाही राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती