राज ठाकरे पुण्यासह मराठवाड्या दौऱ्यावर

मंगळवार, 17 जुलै 2018 (15:28 IST)
येत्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे  पुण्यासह मराठवाड्याचा दौराही करणार आहेत.पुणे, मुंबई आणि नाशिकचा टप्पा ओलांडत ठाकरे यांनी आता उर्वरित महाराष्ट्रात फिरण्यास सुरुवात केली आहे. आगामी २०१९च्या लोकसभा आणि विधानसभेची पावलं ओळखत त्यांनी वाटचाल सुरु केली आहे. ठाकरे आज पुण्यात असणार असून उद्या ते महाराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यात सुरुवातीला ते औरंगाबादला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तिथून पुढे जालना,परभणी, बीडलाही त्यांचा दौरा असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना मदतही केली जाईल. 
 
पुण्याला मागच्याच आठवड्यात उद्धव ठाकरेंनी भेट दिली.अमित शहादेखील नुकतेच येऊन गेले आहेत . त्यानंतर येत्या शुक्रवारी गणेश कला क्रीडा मनसेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी शहरावर चांगलेच लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. पक्षाकडून आगामी लोकसभा लढवण्यासाठी उमेदवाराचा शोध सुरु असल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले आहे. मराठवाड्यातही मनसेची स्थिती फारशी चांगली नसून ठाकरे यांनी स्वतः लक्ष देण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत होती.अखेर ठाकरे यांनी पक्षाला ठराविक भागापुरते सीमित न ठेवता राज्यात पोचवण्याचे मनावर घेतले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती