मुंबई : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) पत्राला उत्तर देताना अरविंद सावंत म्हणाले की, सत्तेचा ताम्रपट आम्ही घेऊन आलोय असं आम्ही कुठेही म्हटलं नाही. सत्तेकडे आपण नाही तर सत्ता आपल्याकडे आली पाहिजे असं बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) आम्हाला सांगितलं. राज ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत. त्यांना या राज्यामध्ये अशांतता निर्माण करायची होती, मात्र त्यांना जे हवं होतं ते घडलं नाही असं अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले.
राज ठाकरेंच्या खांद्यावर भाजपची बंदूक आहे. त्यांनी भोंगा वाजवला, पण तो भोंगा वाजलाच नाही. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था नीट राहिली यामुळे राज ठाकरेंना दुःख झालं. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळेच त्यांनी अशी भाषा आणि असं पत्र लिहिल्याचं अरविंद सावंत म्हणाले आहेत.