नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीवर परिणाम होतील अशी चर्चा होती. निवडणूक प्रचारदरम्यान कोट्यवधी रुपयेही जप्त करण्याच्या घटना घडल्यात. नोटाबंदी असल्यामुळे पैसे वाटपाच्या कार्यक्रमाला चांगलाच लगाम बसला. भाजप नगरपरिषदेच्या निवडणुकीत छाप पाडेल की नाही अशी चर्चा होती मात्र, भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे कोणाला बंदीचा तोटा आणि सत्ता धारी भाजपला फायदा झाला असेल असे मत राज यांनी मत व्यक्त केली.