काही कारण नव्हते तरींही काही दिवसांपूर्वी पुण्यात होर्डिंगचा सांगाडा रस्त्यावर कोसळून भीषण अपघात झाला. कोणताही दोष नव्हता तरीही दुर्घटनेत चार जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले. सोबत अनेक गंभीररित्या जखमी झाले. जखमींपैकी एक होते उमेश मोरे यांच्या पत्नीने रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली तुटपुंजी रक्कम नाकारली असून कायदेशीर लढा देण्याचे ठरविले आहे. रिक्षाचालक असणारे उमेश मोरे घरात एकटेच कमावते होते. त्यांच्यावर पत्नी, तीन लहान मुली आणि वृद्ध आई-वडील अशा सगळ्यांची जबाबदारी असून, दुर्घटनेत त्यांच्या मेंदुला जबर दुखापत झाली आहे. उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांना पुन्हा रिक्षा चालवता येण्याची शक्यता कमी अर्थात नाहीच असे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. अशा परिस्थितीत रेल्वेने आम्हाला केवळ एक लाख रुपयांची मदत दिली, हे पैसे उमेश यांच्या उपचारासाठीही पुरणार नाहीत. त्यामुळे सुवर्णा मोरे यांनी ही मदत नाकारून अधिकच्या नुकसान भरपाईसाठी कायदेशीर लढा द्यायचा ठरवला आहे