राज्याचे मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

मंगळवार, 3 जानेवारी 2017 (16:59 IST)
राज्याच्या मराठी विभागाच्या वतीने देण्यात येणारे मराठी भाषा विभागाचे ४ सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाले आहेत.  यात श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार भारतीय विचार साधना प्रकाशनाला तर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच यंदाचा मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार  शाम जोशी यांना आणि डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ  यास्मिन शेख यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची  माहिती  मराठी भाषा मंत्री विनोद तावडे  यांनी दिली आहे. येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनीचारही पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

वेबदुनिया वर वाचा