पुरंदर येथे विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाला सात गावांकडून विरोध होत आहे. शेतकऱ्यांचा विरोध असून देखील शनिवारी प्रशासनाकडून विमानतळाच्या जागेचे ड्रोन ने सर्वेक्षण करण्यात आले. याला स्थानिकांनी कडा विरोध केला. दरम्यान पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. या मध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. असे ग्रामस्थांनी सांगितले.
या बाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर प्रचंड नाराजगी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या या ठिकाणी बळाचा वापर करणं अतिशय दुःखद आहे. शासनाने जनतेच्या भावना लक्षात ठेवून संयमाने काम करणे गरजेचे होते. या प्रकरणाला संवेदनशीलतेने हाताळण्याची मागणी त्यांनी केली आहे.