भिडे यांना अटक करा नाही तर मोर्चाला सामोरे जा – प्रकाश आंबेडकर
शुक्रवार, 23 मार्च 2018 (08:32 IST)
कोरेगाव भीमा प्रकरण अजूनही शांत होताना दिसत नाही. या प्रकरणातील प्रथम संशयित मिलिद एकबोटे यांना आगोदर अटक झाली आहे. मात्र दुसरे आरोप आहेत ते संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहेत.
या प्रकरणी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकार यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे. भिडे यांना अटक न झाल्यास 26 मार्चाला विधानसभेवर निघणारा एल्गार मार्च अटळ आहे अशी धमकी वजा इशारा दिला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी अनेक प्रश्न विचारले असून ते म्हणतात की हे संभाजी भिडेंना अटक का करत नाही? याची उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं त्वरित द्यावे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आंबेडकर म्हणतात की शिवजंयतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये संभाजी भिडे फोटोत दिसत आहेत. त्यामुळे मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने मुख्यमंत्र्याना तो इशारा गेला आहे की काय असे त्यांनी सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला.