मोदीकडून पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल

सोमवार, 1 एप्रिल 2019 (17:16 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना मोदी यांनी मावळमधील गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत, शरद पवार यांनी शेतकऱ्यांची पर्वा केली नाही. ते शेतकऱ्यांना विसरले, अशी टीका केली. तसेच पवार कुटुंबात गृहकलह असून त्यांची पक्षावरची पकड गेली आहे. पुतण्याच्या हातून शरद पवारांची हिट विकेट गेली, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले. 
 
पंतप्रधान बनण्याची स्वप्ने बघणाऱ्यांनी आता निवडणुकीत माघारी घेतली, असा टोलाही मोदी यांनी लगावला. शरद पवार केंद्रात १० वर्षे कृषिमंत्री होते. मात्र, त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काही चांगले केले नाही, असाही आरोप त्यांनी केला.
 
महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीची युती कुंभकर्णासारखी आहे. ते जेव्हा सत्तेत असतात तेव्हा ६-६ महिने झोपतात. सहा महिन्यात एक कोणीतरी उठतो आणि जनतेचा पैसा खाऊन पुन्हा झोपी जातो, असे टीकास्त्र मोदी यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीवर सोडले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती