या घटनेत अभिजीत दिपक सुखदरे (वय-२५) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अभिजित हा लॅाकडाऊन असल्यामुळे त्याच्या मित्रांसह मेन रोड भागातील साई सुपर मार्केट या कॉम्प्लेक्सच्या समोरील मोकळ्या पटांगणात क्रिकेट खेळत होता.
हे लक्षात येताच आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला कॉल केला. अभिजीतला ॲम्बुलन्समध्ये दाखल करत साखर कामगार रुग्णालय, श्रीरामपूर येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टर जगधने यांनी त्याला तपासले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले.