शिपाईने बँकेत कॅशिअर बनून 100 कोटींचा घोटाळा करून स्वतः पसार झाला,चार मुख्याधिकारी निलंबित

बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (14:40 IST)
मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे एका सहकारी बँकेत 100 कोटींचा घोटाळा समोर आला आहे. या मध्ये त्या बँकेच्या शिपायानेच कॅशियर बनून बॅंकेत घोटाळा केल्याचे समोर आले आहे. हा शिपाई राकेश पराशर या घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचे समजले आहे. या मध्ये चार मुख्याधिकारी देखील शामिल असून त्यांना निलंबित करून अटक करण्यात आली आहे. या शिपायालाच बॅंकेचे कॅशिअर बनविण्यात आले होते.  त्याने 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला. या संदर्भात तक्रारी समोर आल्यावर भोपाळमध्ये 13 सदस्यांची समिती चौकशी करत आहे. या प्रकरणात शिवपुरी जिल्ह्यातील 3 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी शिपाई हा कुटुंबासह पसार झाला आहे. तसेच या प्रकरणातील अन्य घोटाळेबाज देखील कुटुंबासह पसार झाले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे इतर राज्यांसह असल्याचे ही बोलले जात आहे. पोलीस अद्याप,त्याचा शोध घेत आहे. तो पकडला गेल्यावरच या घोटाळ्याचे धागेदोरे उघडतील. सध्या त्याला शोधणे हे पोलिसांसाठी आव्हानच ठरले आहे. त्याने ते पैसे एखाद्या व्यवसायात गुंतवले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती