कुख्यात गुंड अरुण गवळी पुन्हा एकदा पॅरोलवर सुटणार

मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (10:11 IST)
कुख्यात गुंड अरुण गवळी पुन्हा एकदा पॅरोलवर तुरुंगातून सुटणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला पॅरोल रजा मंजूर केली आहे. गवळीची पत्नी आशा आजारी असल्याने गवळीने तुरुंग प्रशासनाकडे पॅरोलची विनंती केली होती. मात्र तुरुंग प्रशासनाने पॅरोल नाकारल्यानंतर गवळीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सदरची सुनावणी करण्यात आली आहे.

येत्या २५ ऑक्टोबरला मुंबईतील रूग्णालयात अरुण गवळीच्या पत्नीवर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबरला गवळी तुरुंगातून पॅरोलवर बाहेर येणार आहे. तर २ नोव्हेंबरला पुन्हा तुरुंगात परतण्याचे आदेशही नागपूर खंडपीठाने त्याला दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा