अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय पुन्हा ६५

मंगळवार, 20 मार्च 2018 (10:55 IST)

अंगणवाडी सेविकांचे निवृत्ती वय ६० वर्षांवरून पुन्हा ६५ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे मुलांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना ‘मेस्मा’ कायद्याखाली आणल्याचे सांगत ‘मेस्मा’बाबतच्या निर्णयाचे पंकजा यांनी समर्थन केले. पुढील दोन वर्षांत राज्यातील चार हजार अंगणवाडय़ांसाठी इमारत बांधण्यात येईल, असेही पंकजा यांनी जाहीर केले.

ग्रामविकास आणि महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय मागण्यांबाबतच्या चर्चेला पंकजा मुंडे उत्तर देत होत्या. अंगणवाडी सेविकांचे मानधन १५०० रुपयांनी वाढवल्याची माहिती मुंडे यांनी दिली. मानधन वेळेत मिळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्या म्हणाल्या. अंगणवाडी सेविकांचे निवृत्तीवय ६० वरून ६५ वर करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागेल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती