पालखी मार्गात अडथळा आणला, संभाजी भिडेसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

पालखी मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे माऊलींची पालखी गुडलक चौकात एकाच जागी थांबून राहिली. त्यामुळे माऊलींच्या पालखीला पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला विलंब झाला. मागच्या अनेक वर्षांपासून भिडे गुरुजींचे समर्थक हा प्रकार करत असल्याचा आरोप दिंडीतल्या प्रमुखांनी केला. 

वेबदुनिया वर वाचा