मिळालेल्या माहितीनुसार परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना २७ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश दिले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, नागपूरमध्ये १८, ठाणे शहरात १९, जळगावमध्ये १२ आणि पुणे शहरात तीन पाकिस्तानी नागरिक आहे, तर नवी मुंबई, मुंबई आणि रायगडमध्ये प्रत्येकी एक पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन व्हिसावर आहे. व २७ एप्रिलपर्यंत त्यांचे देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, नाशिकमधील अधिकाऱ्यांनी शहरात सहा पाकिस्तानी महिला राहत असल्याची पुष्टी केली आहे परंतु त्यांना त्यांच्या हद्दपारीची कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आयुक्तालयाला परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (FRRO) कोणतेही लेखी निर्देश मिळालेले नव्हते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जिल्हा दंडाधिकारी जलज शर्मा म्हणाले, "प्रशासन सतर्क आहे. आम्हाला अद्याप आदेशाची अधिकृत प्रत मिळाली नसली तरी, आम्ही आवश्यक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे."