महाराष्ट्रातील कोल्हापुरात सोशल मीडियावर औरंगजेबाचा फोटो पोस्ट करण्यावरून वाद झाला, ज्याने काही वेळातच उग्र रूप धारण केले होते. त्यावरून राजकारण सुरू झाले आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणावर वक्तव्ये करण्यास सुरुवात केली.
कोल्हापुरातील घटनांचा संदर्भ देत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की- 'महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाची औलादी अचानक जन्माला आली आहेत. हे लोक औरंगजेबचा फोटो आणि पोस्ट स्टेटस मध्ये टाकत आहेत. त्यामुळे समाजातील वातावरण बिघडत असून तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. प्रश्न असा आहे की औरंगजेबाची इतकी औलादी अचानक जन्माला येतात कुठून?
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या कानावर देवेंद्र फडणवीस यांचे शब्द गेल्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, 'महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, ती औरंगजेबाची औलादी आहे. बरं तुमच्याकडे सगळी माहिती आहे. कोण कोणाची औलादी आहे माहीत आहे का? तुम्ही इतके तज्ञ आहात हे मला माहीत नव्हते. मग गोडसेची औलाद कोण, मला सांगा. कोण आहे आपटेची औलाद, सांगा. असा बोचरा सवाल ओवेसी यांनी केला.