तसेच हवामान खात्याने आजही राज्याच्या काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.पुणे, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला असून, तो पुढील २४ ते ४८ तास लागू राहील.
मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट
केवळ उत्तर महाराष्ट्रातच नव्हे, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड येथेही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, दोन सक्रिय पश्चिमी वाऱ्यांमुळे मान्सूनपूर्व हालचाली तीव्र झाल्या आहे.