नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे.जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील कांदा व्यापाऱ्यांकडे आयकर विभागाला 26 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे समजते. केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागानं केलेल्या या कारवाईत तब्बल 26 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 100 कोटींहून अधिक रकमेची बेहिशेबी मालमत्ता असल्याचं उघड झाली आहे.