बेरोजगार इंजिनिअरला एकतर्फी प्रेमाला नकार म्हणून तरूणीच्या हॉस्टेलमध्ये जाऊन गोळीबार

तरूणीच्या हॉस्टेलमध्ये जाऊन  २३ वर्षीय बेरोजगार इंजिनिअरने एकतर्फी प्रेमाला नकार दिला म्हणून गोळीबार केला आहे. पुणे येथील बालेवाडीमध्ये ही घटना घडली असू, हा  गोळीबार केल्यानंतर तरूणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारत पळण्याचा प्रयत्न  केला होता. हा बेरोजागार  यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना बालेवाडीतीव नीक मार्क कॉलेजच्या लेडिज हॉस्टेलमध्ये घडली आहे. हा परप्रांतीय तरुण मध्य प्रदेश येथील रहिवासी असून त्याचे नाव सूरज महेंद्रकुमार सोनी (मध्य प्रदेश) आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सोनी हा मूळचा मध्य प्रदेश येथील रहिवासी असू, सूरजचेच कॉलेजमधील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम निर्माण झाले. त्यात त्याने तिला प्रपोज केले होते, तेव्हा   तिने नकार दिला. त्या मुलीने त्याचे फोन उचलणेही बंद केले. यामुळे तिला घाबरवण्यासाठी सूरजने सरळ लेडिज हॉस्टेल मध्ये दाखल झाला आणि  त्या तरूणीशी बोलण्याचा प्रयत्न केला.  बोलण्यासही तिनं नकार दिल्याने सूजने तिला घाबरवण्यासाठी आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला होता.  गोळीबाराचा आवाज ऐकून होस्टेलमधील एकच  गोंधळ निर्माण झाला होता. तेव्हा मुली जमा होत असल्याचे पाहून त्याने स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी हॉस्टेल पाचव्या मजल्यावरुन पळ काढला. यामध्ये तो जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुस्तुल जप्त केले आहे. त्याच्याकडे पिस्तुल कसे आले याचा शोध सुरू केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती