मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू केंद्रीय परिवहनंत्री नितीन गडकरी यांनी सावरून घेतली आहे. देवेंद्रांना मी लहानपणापासून ओळखतो. ते सुसंस्कृत आहेत. त्यांच्या साम, दाम, दंड व भेदचा अर्थ सर्व ताकद लावा असा होतो, असे गडकरी यांनी सांगितले.
केंद्र सरकारला चार वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना-भाजपमध्ये सध्या आलेल्या कमालीच्या कटुतेनंतरही गडकरी यांनी युती टिकावी, अशी भावना व्यक्त केली. सेना-भाजपची स्थिती 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना' अशी आहे. आमची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे.