नाशिक मेट्रोसाठी काय घोषणा झाली, जाणून घ्या

सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (13:36 IST)
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. रेल्वेच्या सेवा सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १.१० लाख कोटींची तरतूद केली आहे. निर्मला सीतारमन यांनी बजेटमध्ये नाशिक मेट्रोसाठी 5000 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुऴे आता मुंबई-पुणे-नाशिक त्रिकोणातील नाशिकमध्येही मेट्रो प्रकल्प आकारास येणार आहे. त्यासाठी 5000 पेक्षा मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे.
 
नाशिकच्या बहुचर्चित मेट्रो निओ तब्बल 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा मेगा प्रोजेक्ट आहे. इतर मेट्रो प्रकल्पांपेक्षा नाशिक मेट्रोची वेगळी बाब म्हणजे मेट्रो निओ चक्क रस्त्यावरूनही धावणार आहे. 
 
या मेट्रोची चाकं धातूची नसणार तर इतर गाड्यांप्रमाणे रबराची असतील. शहरातील दोन प्रमुख मार्गांवर ही टायर-बेस मेट्रो धावणार आहे.

महत्त्वाची माहिती म्हणजे मेट्रो गंगापूर ते नाशिक रेल्वेस्टेशन आणि गंगापूर-मुंबई नाका यादरम्यान उन्नत मार्गावर धावणार. यात ऑटोमेटिक डोर, लेव्हल बोर्डिंग, आरामदायी सीट्स, प्रवासी माहिती फलक इत्यादी व्यवस्था असेल. 
 
क्षमतेबद्दल सांगायचे तर यात 18 ते 25 मीटर वातानूकूलित विजेवर चालणारे कोच तसेच 200 ते 300 प्रवाश्यांची बसण्याची क्षमता असेल. मेट्रो स्टेशनांवर लिफ्ट, एस्केलेटर, जिना या सुविधा असतीतल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती