प्रतिष्ठानतर्फे शनिवार (दि.२०) सकाळी स्वराज सातला सामूहिक ढोल प्रदक्षिणा काढण्यात येईल. सकाळी दहा ते अकरा यावेळेत दया कुलकर्णी यांचे कीर्तन होईल. दुपारी ४ ते ७ यावेळेत सरलाजी चांडक माहेश्वरी यांचे सुंदरकांड होईल. सुप्रसिद्ध गायक, गायिका व नृत्यांगना यांचा श्रीराम गुणगान कलाविष्कार होईल.
रविवारी (दि.२१) सकाळी सातला सामूहिक रामरक्षा व भीमरूपी स्तोत्र पठण, दुपारी चार ते सात यावेळेत सारंग गोसावी श्रीराम स्वागत भजन सादर करणार आहेत. रात्री आठ ते दहा यावेळेत गीत रामायण होईल. सोमवारी (दि.२२) सकाळी आठ ते दहा यावेळेत दया कुलकर्णी यांचे कीर्तन तर सकाळी दहा ते बारा यावेळेत मनकामेश्वर भक्त मंडळ भजन सादर करतील. दुपारी बारा ते साडेबारा महाआरती होईल. सायंकाळी सहाला श्री काळाराम मंदिराच्या परिसरात दीपोत्सव होईल. यावेळी दिवे प्रज्वलित केले जातील.