जिल्हा अधीक्षक शहाजी उमप यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हयातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचा विशेष मोहिमेचा एक भाग म्हणून वाडीवरहे,पिंपळगाव बसवंत, सुरगाणा, कळवण, सायखेडा, दिंडोरी, इगतपुरी तालुक्यात छापे टाकून सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
वाडीव-हे पोलीस ठाणे हद्दीतील मुकणे शिवारात राखाडूच्या डोहाजवळ अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. त्यात १,१८,४०० रुपये किंमतीचे गावठी दारू,हातभट्टीचे साहित्य व रसायन हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच सुरगाणा व सायखेडा पोलीस ठाणे हद्दीत रोकडपाडा(ता.सुरगाणा)व शिंगवे, ता. निफाड परिसरात अवैधरित्या सुरु असलेल्या मटका आणि जुगाराच्या अड्ड्यांवर छापे टाकून महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यान्वये २ गुन्हे दाखल करून ८७,०३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
नांदुरी(ता.कळवण) येथे एक ब्रास वाळू,ट्रॅक्टर, मोबाईल असा चार लाख 9 हजार,जानोरी(ता.दिंडोरी) शिवारात गोदरेज कंपनीच्यापुढे देशी,विदेशी मद्याचा 25हाजाराचा अवैध साठा,इगतपुरी येथे न्यू खालसा पंजाबी ढाबा येथे देशी-विदेशी मद्याचा सुमारे 6 हाजाराचा साठा जप्त केला. पिंपळगाव बसवंत येथे हॉटेल भोले पंजाब येथे कारवाई करून न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे.!