ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अवघ्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. यात सुमारे तीनशे पानांचे दोषारोपपत्र तयार केले आहे़. पोलिसांनी तयार केलेल्या या दोषारोपपत्राबाबत जिल्हा सरकारी वकीलांकडून मार्गदर्शन घेतले जात आहे़. जिल्हा सरकारी वकीलांकडे सादर करण्यात आलेल्या या दोषारोपत्रावर मार्गदर्शन घेतल्यानंतर येत्या गुरुवारपर्यंत ते न्यायालयात सादर केले जाईल.