नाशिक मशिदीवरील भोंगे उतरवा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंवक्तव्य त्यांच्यामते धार्मिक पेक्षा समाजिक प्रश्नावरून असल्याचा दावा केला जात आहे. मात्र मागील काही दिवसांमध्ये राम नवमी, हनुमान जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये काही अनुचित प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
मुंबई पोलिसांच्या सोशल मीडीया लॅब द्वारा समाजमाध्यमांवरील तेढ निर्माण करू शकणारी 03 हजार पोस्ट हटवल्याची माहिती देखील मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान राम नवमी सेलिब्रेशन मध्ये हिंसाचार केल्याच्या प्रकरणी ०६ केसेस रजिस्टर करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या मानखुर्द भागात दोन समाजात झालेल्या तणावात ३० जण पोलिस ताब्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे तर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये ६१ जणांवर कारवाई करत त्यांना अटक झाल्याची देखील माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य पोलिस संचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त मिळून येत्या 1-2 दिवसांत मुंबई सह राज्यभरासाठी नियमावली जारी करणार आहेत. सध्या केवळ परवानगी असलेल्या लाऊसस्पीकरलाच वाजवण्यास मुभा आहे असे महाराष्ट्र राज्य गृहविभगाने जारी केले आहे.