एकावन्न कला अविष्कारांचा नाशिक ढोलचा विक्रम

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (11:17 IST)
नशिकचा ढोल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यातही नाशिक मधील अनेक पथके नव नवीन प्रयोग करत असतात. असाच प्रकार पुन्हा केला आहे शिवराय ढोल पथकाने. स्थानिक कलागुणांना वाव मिळावा, संस्कृतीची जोपासना व्हावी, श्लोकांचे आजच्या पिढीला महत्त्व कळावे या करीता ‘एक ताल एक श्लोक’ असा अभिनव प्रयोग केला गेला आहे. यामध्ये ५१ कला सादर केल्या आहेत. या उपक्रमाची नोंद जिनिअस बुक, एशिया बुक व वर्ल्ड रिकॉर्ड बुक इंडिया, वंडर बुक आॅफ लंडन यामध्ये या उपक्रमाची नोंद करण्यात आली आहे.
 
गंगापूररोड परिसरातील ढोलवादनाचा उपक्रम आयोजित केला, शुभश्री बहुद्देशीय संस्थेच्या विविध चित्रकार, शिल्पकार,कलाकारांनी तब्बल ५१ पेक्षा अधिक कलांमधून विविध कलाकृतींचे सादरीकरण केले आहे. त्यासोबतच श्लोक म्हणत  ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पठण करत उपस्थित वादक, कलाकार, चित्रकारांना त्यांनी साथ दिली आहे.
 
या अभिनव प्रयोगात जवळपास  दोनशे वादक सहभागी झाले होते. या वादकांनी शिवताल, ढोलीबाजा, गझर, नाशिकढोल, भीमरुपी, भांगडा, पुणे ढोल, संबळ, रमणबाग सुमारे ५१ तालांवर वादकांनी ढोल-ताशाचे वादन केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती