दशक्रियेला पत्नी मुलांना घेऊन आली आणि माझे पती आत्महत्या करणार नाही ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय तिने व्यक्त केला.त्यावर संतापून महिलेच्या नणंदेने तिला मारहाण करायला सुरुवात केली.गावातील काही महिलांनी देखील नणंदेला साथ देत विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासून तिच्या गळ्यात चपलांचा हार टाकत गावात धिंड काढली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतातच त्यांनी गावात जाऊन पीडित महिलेची सुटका करत वडनेर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.