त्र्यंबकेश्वर येथे इंदौर येथील बालिका अत्याचाराच्या सखोल चौकशीची मागणी

सोमवार, 5 फेब्रुवारी 2018 (09:00 IST)

परराज्यातून इंदूर त्र्यंबकेश्वर येथे शांती पूजेसाठी आलेल्या कुटुंबीयांसोबत बालिकेवर पुरोहिताने केलेल्या अत्याचार प्रकरणी चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदीप कोतवाल यांनी केली आहे. स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांना निवेदन दिले.या प्रकरणी बालिकेवर अत्याचार झाले असतील तर या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि सत्य असेल ते उजेडात आणावे. त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाला असलेले धार्मिक महत्व लक्षात घेता अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी चुकीच्या मुद्द्यावर स्थानिकाचे समर्थन करून यजमानांना असुरक्षित वातावरण तयार करणाऱ्या पोलिसांची निष्पक्ष चौकशी व्हावी, असे निवेदन पोलीस अधीक्षक कार्यालयात डॉ. संदीप कोतवाल यांनी दिले आहे. यावेळी विशाल वारूळ, प्रल्हाद धुमाळ आणि नितीन देसले, आदी उपस्थित होते.तत्पूर्वी, अत्याचाराचा प्रयत्न झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याचे दिसले. तक्रार करण्यास पोलीस स्टेशनमध्ये पोहचलेल्या पालकांना पोलिसांनी तडजोड करून भलतीच गोष्ट तयार करत मुलीला केवळ धक्काबुक्की केली अशी तक्रार देण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजते.याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, मध्यप्रदेशातील इंदूर येथील दाम्पत्य २९ जानेवारीला पूजा करण्यास दाखल झाले. पुजाऱ्याने पूजा सांगितल्यानंतर बळीचे पत्र घेऊन खाली गेले. यावेळी घरात एकट्या असलेल्या त्यांच्या ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. कौस्तुभ विकास मुळे अश्लील चाळ्यांना घाबरून ती मुलगी ओरडत बाहेर आली.याबाबत जाब विचारणाऱ्या पालकांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न घडल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस तुम्ही तक्रार द्या, आम्ही गुन्हा दाखल करतो असे बोलत. तर दुसरीकडे तुम्ही लांबून आला आहात. पुढे न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुन्हा पुन्हा इथे यावे लागेल अशी भीतीही दाखवत राहिले.किलास्वाना प्रकार म्हणजे पोलीस पुन्हा पुन्हा त्या बालिकेस नेमके काय घडले याचे वर्णन करण्यास सांगत होते. त्यामुळे ती बालिका अजूनच बिथरली. स्थानिक भाषा म्हणजेच मराठी भाषेची अडचण आणि पोलीस स्टेशन बाहेर जमलेला शेकडोंचा जमाव यामुळे यजमानांनी तेथून जाण्याचा निर्णय घेतला. केवळ धक्काबुक्की केली अशी टाकरस घेऊन अदखलपात्र गुन्हा नोंदवून पोलिसांनी यजमानांची बोळवण केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती