Heavy Rain In Nagpur: नागपुरात पावसाचा उद्रेक सुरु आहे. सर्वत्र पाणी साचले असून शहरात पूरसदृश्य परिस्थिती उदभवली आहे. मध्यरात्री शहरात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक घरात पाणी शिरले. पुरातून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. एनडीआरएफची पथके बचावकार्य करत आहे. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत आहे.
शुक्रवार पासून पासून सुरु असून पावसाचा वेग वाढला पावसाची तीव्रता वाढल्यामुळे अंबाझरी तलाव देखील ओसंडून वाहत आहे. नागपूर विमानतळावर पहाटे 5.30 वाजेपर्यंत 106 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे नागपुरातील अनेक भाग जलमय झाले असून रस्ते जलमय झाले आहेत. परिस्थिती पाहता प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, सतत पाऊस पडत आहे, त्यामुळे अंबाझरी तलाव ओसंडून वाहत आहे.