नंदूरबारमध्ये खान्देशातील सर्वात मोठा झेंडा

मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017 (16:49 IST)

खान्देशात सर्वात मोठा झेंडा उभारण्याचा मान नंदूरबार पालिकेला मिळालाय. नंदूरबार शहराची ओळख बाल शहिदांची भूमी म्हणून आहे. त्यामुळे नंदूरबारच्या बाल शहिदांना अभिवादन करण्यासाठी नंदूरबार नगरपालिकेच्यावतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराच्या परिसरात 110 मीटरचा ध्वज स्तंभ उभारण्यात आला असून 20 बाय 30 फुटाचा राष्ट्र ध्वज 24 तास डौलाने फडकणार आहे. 

आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्यावतीने ध्वजस्तंभ उभारण्यात आला असून नगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आलाय. 25 आक्टोबर रोजी शहीद पत्नी हर्षदा खैरनार यांच्या हस्ते हा ध्वज फडकविण्यात येणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती