अनुराग विजय गायधने वय 20 वर्ष रा. शहर वार्ड तुमसर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. आय.टी.आय. परिक्षेत नापास झाल्यामुळं तो नैराश्यात होता. विद्यार्थ्याने उल्लेख केलेल्या माडगी पुलावर सायकल आणि जॅकेट आढळले आहे, मात्र 48 तास गेल्यानंतरही विद्यार्थ्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
विद्यार्थ्याच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज आहे. माडगी येथील वैनगंगा नदीच्या पुलावरुन नदी पात्रातील पाण्यात उडी घेत त्याने आत्महत्या केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज पुन्हा पोलिसांचे शोधकार्य सुरू असून पोलिस पुढील तपास करत आहेत.