पाच ऑगस्टला सुद्धा निकाल नाही-तावडे विरोधात हक्कभंग

बुधवार, 2 ऑगस्ट 2017 (08:57 IST)
मुंबई विद्यापीठाने दिलेल्या नव्या डेडलाईनला म्हणजेच 5 ऑगस्टलाही निकाल लागणार नसल्याची माहिती स्वतः कुलगुरूंनी दिली आहे. त्यामुळे विरोधक आता आक्रमक झाले आहेत.त्यामुळे आता घोळाप्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात हक्कभंग आणण्याच्या तयारीत आहेत. त्यासंदर्भात विधान परिषदेत हक्कभंगावर विचार सुरु झाला आहे.
 

शिवसेना विनोद तावडेंविरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंग आणणार आहे.  विधानसभेत उच्चशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकरांविरोधात काँग्रेस हक्कभंग आणणार आहे.मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल 15 ऑगस्टपर्यंत लागण्याची शक्यता आहे. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता कुलगुरु पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देणार आहेत.     त्यामुळेकला मोठा घोळ होणार आहे. विद्यार्थी तर भरडले गेले आहेत, तर विरोधक      मोठ्या प्रमाणावर राजकारण करत आहेत. त्यामुळे आता गोंधळ होणार हे नक्की आहे.

वेबदुनिया वर वाचा