Apple Retail Store: भारतातील पहिल्या Apple Store चे आज मुंबईत उद्घाटन होणार आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू होणाऱ्या या स्टोअरचे उद्घाटन करण्यासाठी अॅपलचे सीईओ टीम कुक स्वत: भारतात आले आहेत. कंपनीला आशा आहे की हे किरकोळ स्टोअर्स 1.4 अब्ज लोकसंख्येच्या देशात तिची उपस्थिती मजबूत करण्यास मदत करतील. लोकांमध्येही मोठा उत्साह दिसून येत असून दुकान उघडण्यापूर्वीच बाहेर खरेदीदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
आयफोन निर्माता Apple ने 2023 च्या आर्थिक वर्षात भारतात $ 6 बिलियनची विक्री केली आहे. त्याच वेळी, गेल्या आर्थिक वर्षात भारतात त्याची विक्री $4.1 अब्ज होती. अॅपल इंडियाने एका आर्थिक वर्षात केलेली ही सर्वाधिक विक्री आहे. यावरून अॅपलसाठी भारताचे वाढते महत्त्व कळू शकते.