मुंबई -गोवा सागरी महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु

शुक्रवार, 29 डिसेंबर 2017 (16:19 IST)

ख्रिसमसचे औचित्य साधत मुंबई -गोवा सागरी महामार्गावर 'शिवशाही' बस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता ही बस मुंबई-मालवण मार्गावरही धावणार आहे.  मुंबई - पणजी 'शिवशाहीसाठी केवळ ९१३ रुपये तिकीट दर आकारण्यात येत आहेत. त्यामूळे मुंबई-मालवण  सागरी मार्गावरील बसचे भाडेही तुलनेत कमी असणार आहे.
या वातानुकूलित बस प्रवासासाठी ६०० रुपये तिकीट दर ठेवण्यात येणार आहे. 'शिवशाही' बस अत्यंत आरामदायी वातानुकूलित असल्याने प्रवास आरामदायी होतो. त्यामूळे जास्तीत जास्त प्रवाशांनी याचा लाभ  घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.ही बस बोरिवली येथून रोज सायं.४.३० वाजता सुटणार आहे. या बसचा मार्ग पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, पावस, आडिवरे, नाटे, जैतापूर, पडेल कॅण्टीन, जामसंडे , कुणकेश्वर, देवगडमार्गे मालवण असा असणार आहे. परतीच्या मार्गावर मालवणहून ही बस दुपारी ३ वाजता सुटणार आहे.
ही बस मुंबई सेंट्रल येथून रोज संध्याकाळी ५.०० वाजता सुटणार असून पनवेल, चिपळूण, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी , बांदा, म्हापसा मार्गे पणजीला जाईल. तसेच पणजीहून दररोज संध्याकाळी ६ वाजता याच मार्गे परतीचा प्रवास करेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती