रात्रभरात निळे पडले मुंबईचे कुत्रे

मुंबईत या दिवस कसली चर्चा असेल तर ती आहे निळ्या कुत्र्यांची. मुंबईच्या रस्त्यांवर निळे कुत्रे दिसत आहे. सूत्रांप्रमाणे अनेक पांढर्‍या रंगाचे कुत्रे रात्रभरात अचानक निळे पडले. मुंबईच्या तळोजा औद्योगिक क्षेत्राच्या जवळपास राहणार्‍या कुत्र्यांचा रंग बदलून निळा होत आहे.
 
खरं तर, मीडिया रिर्पोट्सप्रमाणे तळोजा औद्योगिक क्षेत्रात स्थित कसादी नदीत औद्योगिक अपशिष्ट पदार्थ प्रवाहित होत असल्यामुळे ही समस्या येत आहे. या नदीचे पाणी पूर्णपणे प्रदूषित झाले आहेत. जवळपास असलेले हजारो कारखान्यांतून विषारी पाणी या नदीत मिसळत आहे. ज्याने कोणताही जनावर याचा संपर्कात आल्यावर निळा पडू लागतो.
 
तज्ज्ञ म्हणतात की या विषारी पाण्यामुळे माणसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. तसेच कोळीदेखील याबद्दल काळजी प्रकट करून चुकले आहे की प्रदूषित नदीमुळे मासोळ्यांवरदेखील वाईट परिणाम होत आहे.
 
या प्रकरणात नवी मुंबई पशुसंवर्धन कक्षाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबद्दल तक्रार नोंदवली आहे. आणि येथील जनावर पीडित होत असल्याची माहिती दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा