महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित मुले

सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (16:36 IST)
भारत सरकारच्या आकडेवारीनुसार देशात ३३ लाखांहून अधिक मुलं कुपोषित असल्याचे समोर आले आहे. यामध्ये अर्ध्याहून जास्त म्हणजेच १७.७ लाख मुलं गंभीर स्वरुपात कुपोषित आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मुलं महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमधील आहेत.याबाबत माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयाने एका आरटीआयच्या उत्तरात दिली आहे. मंत्रालयाने पीटीआय वृत्तसंस्थेद्वारे एका आरटीआयमधील उत्तरात म्हटले की, ३४ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा हा एकूण आकडा आहे. देशात एकूण ३३ लाख २३ हजार ३२२ मुलं कुपोषित आहेत.
 
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे गरीबांमध्ये आरोग्य आणि पोषण संकट आणखीन वाढले. याबाबत चिंता व्यक्त करत मंत्रालय म्हणाले की, १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत देशात १७.७६ लाख मुलं गंभीर कुपोषित (एसएएम) आणि १५.४६ लाख मुलं अल्प कुपोषित (एसएएम) होते. सध्या हा आकडा खूप खतरनाक आहे. परंतु गेल्या वर्षाच्या नोव्हेंबरच्या आकड्याशी तुलना केली असता हा आकडा अधिक खतरनाक झाला आहे. नोव्हेंबर २०२० आणि १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान एसएएम मुलांचा आकडा ९१ टक्क्यांनी वाढला आहे. जो आता ९ लाख २७ हजार ६०६ (९.२७ लाख) हून वाढून १७.७६ लाख झाला आहे.
 
दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित मुलांचा आकडा आहे. ६.१६ लाख महाराष्ट्रातील मुलं कुपोषणाचा शिकार झाली आहेत. ज्यामधील १ लाख ५७ हजार ९८४ मुलं अल्प कुपोषित असून ४ लाख ५८ हजार ७८८ मुलं गंभीर स्वरुपात कुपोषित आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बिहार आहे, जिथे ४ लाख ७५ हजार ८२४ मुलं कुपोषित आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून येथे ३.२० लाख एकूण मुलं कुपोषित आहेत.
 
या यादीत राजधानी दिल्ली मागे नाही आहे. दिल्लीत १.१७ लाख मुलं कुपोषित आहेत. २०११च्या जनगणनेनुसार देशात ४६ कोटींहून अधिक मुलं आहेत.
 
ग्लोबर हंगर इंडेक्समध्ये भारत १०१ स्थानावर आहे. यामध्ये भारताने शेजारील देश पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी भारत जागतिक उपासमार निर्देशांकात भारत ९४व्या क्रमांकावर होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती