पाऊस येणार, ३ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

येत्या तीन दिवसात  राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पावसाचं कमबॅक होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पीकं करपल्यानं हतबल झालेल्या बळीराजालाही दिलासा मिळणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढच्या 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
मराठवाडा आणि विदर्भातील जिल्हे ऐन पावसाळ्यातही कोरडे ठाक पडले आहेत. तर पावसाने दडी दिल्याने पश्चिम महाराष्ट्रातही जमीनीला भेगा पडत आहेत. जुलैमध्ये 355 पैकी तब्बल 223 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्केही पाऊस झाला नाही. त्यात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्केही पावसानं कृपा दाखवली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती