'लाडकी बहिण योजना' लाभ करिता कागदपत्र जमा करण्यासाठी गेलेल्या महिलेकडून घेतले पैसे

बुधवार, 3 जुलै 2024 (14:31 IST)
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ उठवण्यासाठी कागदपत्र जमा करण्यासाठी गेलेल्या महिलेकडून पैसे घेण्यात आले आहे. पैसे घेतानाच व्हिडीओ वायरल झाल्यांनतर पैसे घेणाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. 
 
महाराष्ट्र सरकार ने 'लाडकी बहीण योजना' अंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 देण्याचे घोषित केले  आहे. अनेक महिला  सरकारी कार्यालयमध्ये जाऊन या योजनेचा फायदा घेण्याकरिता कागद पत्र जमा करीत आहे. या दरम्यान, अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक व्हिडीओ समोर आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती प्रत्येक महिलांकडून 50-50 रुपये कागदपत्र जमा करण्यासाठी घेत आहे.  
 
अमरावती जिल्ह्यातील वरुण तालुक्यामध्ये सावंगी गावाचा पटवारी महिलांकडून 50-50 रुपये वसूल करीत आहे. याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटारिया यांनी पटवारी ला तात्काळ सस्पेंड केले आहे. 
 
पटवारीला करण्यात आले निलंबित-
मिळालेल्या माहितीनुसार सावंगीच्या पटवारी विरुद्ध FIR दाखल करण्यात आली आहे. पटवारी व्दारा महिलांकडून पैसे घेण्याचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर चौकशीनंतर जिल्हाधिकारींनी पटवारीला निवलंबित करून त्याच्या विरोधात FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती