2014 च्या विधानसभेत संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचा मोठा परभव झाला होता. यामध्ये मनसेचे सर्व विद्यमान आमदारदेखील पराभूत झाले, मात्र सोनावणे यांनी पुणे येथील जून्नरमध्ये विजय मिळवला होता. आता मात्र सोनावणे यांनी देखील मनसे पक्ष सोडण्याच्या तयारी केली आहे. सोनावणे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ते आजच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी जोरदार शक्यता आहे.
शिवसैनिकांनी मात्र आमदार शरद सोनावणे यांना पक्षात घेण्यास जोरदार विरोध दाखवला आहे. शिवसैनिक आम्हाला बाहेरचा उमेदवार नको, आम्ही तो स्वीकारणार नाहीत, अशी स्थानिक शिवसैनिकांची भावना आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कोणत्या प्रकारे हे प्रकरण हाताळतील हे येणार दिवसात दिसणार आहे.