राज ठाकरे यांचा एक नवा लुक इंटरनेटवर व्हायरल

सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (08:27 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या स्टाईलला देखील अनेकांकडून पसंती मिळत असते. सध्या राज ठाकरे यांचा एक नवा लुक इंटरनेटवर व्हायरल होतोय. पन्नाशी ओलांडलेले राज ठाकरे गॉगल, टीशर्ट, स्पोर्ट शूज आणि दाढीमध्ये या फोटोत दिसत आहेत.
 
मार्च पासून लागलेल्या लॉकडाऊनमध्ये सलून बंद असल्या कारणाने सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटी, राजकारण्यांनी देखील केस आणि दाढी वाढविण्याची स्टाईल जपली. आता नेहमी पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसणारे राज ठाकरे टीशर्ट, गॉगलमध्ये दिसल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं.
 
राज ठाकरेंचे तरुणपणापासून एक स्टाईल स्टेटमेंट राहिलेले आहे. विशेषतः मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे हे शक्यतो पाढंरा कुर्ता, पायजमा या पेहरावात दिसत होते. क्वचितच या काळात त्यांनी आपली स्टाईल बदलल्याचे दिसले. मध्यंतरी देखील त्यांचा फ्रेंच दाढीमधला फोटो व्हायरल झाला होता. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती