देशात सध्या ज्ञानवापी मशिदीच्या मुद्दयावरुन वाद सुरु आहे. मशिदीच्या ठिकाणी आधी शिवलिंग होतं, त्यामुळे मशिदीचं उत्खनन करण्याची मागणी हिंदु पक्षाने केली आहे, तर मशिदीच्या वजुखान्यातील कारंज्यांनाच हिंदु पक्ष शिवलिंग म्हणत असल्याचा आरोप मुस्लिम पक्षाने केला आहे. त्यामुळे आता हा वाद कोर्टात आहे. याच विषयावर आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक दावा केला आहे.
गोपीचंद पडळकर हे वारंवार राष्ट्रवादीला घेत असल्याचे पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे ते हिंदुत्वाच्या मुद्दयावर देखील दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत. आता त्यांनी ज्ञानवापी मशिदीबद्दल एक वक्तव्य केलं आहे. ज्ञानव्यापी मशिद पाडण्यासाठी मल्हारराव होळकर हेच स्वत: गेले होते. मात्र तिथल्या हिंदू लोकांच्या विनंतीनंतर ती मशिद त्यांनी पाडली नाही असं पडळकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता यावर आणखी काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर देखील पडळकरांनी टीका केली आहे. जालन्यात एका कार्यक्रमानिमित्त पडळकर आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राजेश टोपे यांनी ब्लॅक लिस्ट कंपनी परीक्षेचं कंत्राट दिलं. त्याचबरोबर पैसे घेऊन त्यांनी परीक्षेचा पेपर फोडला. त्यामुळं टोपे हे बुद्धु आहेत. न्यासा या परीक्षा घेणाऱ्या कंपनीनं त्यांना काही तरी दिलं आहे त्यामुळं ते या कचाट्यात सापडले असून त्यांना याबाबत काही बोलता येत नाही. त्यामुळं येणाऱ्या अधिवेशनात टोपे यांनी आरोग्य विभागात केलेला घोटाळा बाहेर काढणार असल्याचं पडळकर यांनी म्हंटलंय.