राज्याचा सामायिक प्रवेश परीक्षा सेल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक सीईटी परीक्षेस आजपासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रात एकूण 3 लाख 96 हजार परीक्षार्थी या परिक्षेला बसणार आहे. हे परीक्षार्थी पीसीएम, पीसीबी आणि पीसीएमबी या गटांमध्ये परीक्षा देतील.
महत्त्वाची माहिती
विहित वेळेत उमेदवारांनी केंद्रावर पोहचावे.
परीक्षा केंद्रावर दाखल होताना परीक्षार्थींकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
परीक्षार्थी विद्यार्थ्याने भरलेल्या ऑनलाईन अर्जात नाव, जन्मतारीख, लिंग, उमेदवाराचा फोटो व उमेदवाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराचा पत्ता भरताना काही चुका झाल्या असतील, त्याबाबत विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर जाऊन हमीपत्र भरून देण्याची सूचनाही विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे.
उमेदावारासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड/ ई-आधार कार्ड, पॅन कार्ड भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स