सांगली: सामूहिक नमाज पठण, 36 जण ताब्यात

शुक्रवार, 3 एप्रिल 2020 (16:26 IST)
देशभरात लॉकडाउन जाहीर असून देखील नमाज अदा करण्यासाठी मशिदीत गोळा झालेल्या 36 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सांगलीच्या मिरजमध्ये ही कारवाई करण्यात आली. 
 
मिरजेतील मच्छी मार्केट येथे असणाऱ्या बरकत मशिदीत सामूहिक नमात पठण केलं जात होतं. यावेळी पोलिसांनी छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतलं. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून सर्वांना नमाजासाठी बोलावण्यात आलं होतं. यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात असून मौलवींच्या माध्मामातून सर्वांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती