मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसर्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती या विधेयकात करण्यात आली आहे. यामुळे आता राज्यातील सर्व दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या झळकतील असे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
राज्यातील मद्यविक्री आणि मद्यपान सेवा पुरविणाऱ्यांची दुकानांची नावे महापुरुषांच्या नावावर असल्याचे दिसून येतात. तर, अनेकांनी गड किल्ल्यांची नावे दुकानांना दिली आहेत. मद्यविक्री व मद्यपान सेवा पुरविणाऱ्या सर्व दुकानांवर महापुरुष/महनीय महिला यांची किंवा गड किल्ल्यांची नावे असू नये, असेही या विधेयकात नमूद करण्यात आले आहे.
- मराठी अक्षराचा आकार हा अन्य कोणत्याही भाषेच्या आकारापेक्षा कमी असता कामा नये.
- नामफलकावर सुरुवातीला मराठी मोठ्या अक्षरात असेल तर त्या शेजारी अन्य कोणत्याही भाषेत नाव लिहिण्यास मनाई करण्यात आलेली नाही