एल्गार प्रकरणातील बोगस कागदपत्रे जाहीर करा : प्रकाश आंबेडकर

बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (08:30 IST)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार प्रकरणातील बोगस कागदपत्रे जाहीर करून केंद्र सरकार लोकशाहीची कशी गळचेपी करत आहे हे उघड करावे. या कागदपत्रांद्वारे मोदी सरकारचा आणि तत्कालीन फडणवीस सरकारचा पर्दाफाश होईल, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
 
एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे या ठिकाणी लावण्यात आले आहेत. हे सुरू असतानाच राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एल्गार प्रकरण बोगस असल्याचं सांगितलं. तसेच एल्गार प्रकरणी तयार करण्यात आलेली कागदपत्रेही बनावट असल्याचं पवारांनी पत्रात नमूद केलं असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे. त्यामुळे त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीची कशी गळचेपी करत आहे हे जनतेला माहीत पडेल, असं आंबेडकर म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती