महाराष्ट्र अनलॉक नियम जाणून घ्या, लॉकडाऊन हटवण्यासाठी राज्य सरकारची पाच स्तरात योजना
शनिवार, 5 जून 2021 (12:35 IST)
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 'अनलॉक' करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलली आहेत. 'मिशन बिगीन अगेन'साठी सरकारने नियमावली जाहीर केलीय. जनजीवन सुरळीत करतानाच कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याचं आव्हान महाराष्ट्र सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारनं पाच स्तरात (Levels) जिल्ह्यांची विभागणी केलीय आणि या स्तरांनिहाय नियम बनवले आहेत.
हे पाच स्तर काय आहेत, ते बनवण्यासाठी काय नियम वापरलेत आणि कुठल्यात स्तरात राज्यातील कुठेल जिल्हे येतात, या सर्व गोष्टी आपण एक एक करून सविस्तर जाणून घेऊया.
राज्य सरकारने कोरोना पॅाझिटिव्हिटी दरानुसार पाच स्तर तयार केले आहेत -
पहिला स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतील.
दुसरा स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांपर्यंत भरलेले असतील.
तिसरा स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
चौथा स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 10-20 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
पाचवा स्तर - पॅाझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असतील आणि ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
आता आपण पाहू की, या स्तरानुसार काय नियम आहेत. मग शेवटी कुठल्या स्तरात कुठला जिल्हा येतो, ते पाहू.
पहिल्या स्तरासाठी हे नियम :
सर्व प्रकारची (अत्यावश्यक सेवेतील आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली) दुकानं नियमितपणे सुरू राहतील.
मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह इत्यादी नियमतपणे सुरू राहतील
रेस्टॉरंट नियमितपणे उघडतील
लोकल ट्रेन पूर्ववत सुरू होतील. मात्र, स्थानिक DMA याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेईल.
सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग नियमित सुरू होईल
सर्व खासगी कार्यालयं सुरू करता येतील.
सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीस परवानगी. खासगी कार्यलयांमध्ये आवश्यक असल्यास 100 टक्के उपस्थितीस परवानगी.
विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल
लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.
बांधकाम, कृषी, ई-कॉमर्स नियमित सुरू राहतील
आंतरजिल्हा प्रवास नियमित. मात्र, लेव्हल-5 जिल्ह्यातून कुणी येत असेल तर ई-पास बंधनकारक असेल.
जमावबंदी लागू राहणार नाही.
दुसऱ्या स्तरासाठी हे नियम :
सर्व प्रकारची (अत्यावश्यक सेवेतील आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली) दुकानं नियमितपणे सुरू राहतील.
मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह इत्यादी 50 टक्के क्षमतेत सुरू होतील
लोकल ट्रेन वैद्यकीय सेवा, अत्यवश्यक सेवा, महिलांसाठी सुरू राहतील. DMA आवश्यकतेनुसार निर्णय घेतील.
सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग नियमित सुरू होईल
सर्व खासगी कार्यालयं सुरू करता येतील.
सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीस परवानगी. खासगी कार्यलयांमध्ये आवश्यक असल्यास 100 टक्के उपस्थितीस परवानगी.
विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी मर्यादा इनडोअर गेम्सना आहे. तर आऊटडोउर गेम्स पूर्ण दिवस बंद राहतील.
चित्रिकरण नियमितपणे सुरू राहील.
सामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
लग्न समारंभांसाठी हॉलच्या 50 क्षमतेइतकी उपस्थितीची मुभा. मात्र, जास्तीत जास्त 100 लोकांना परवानगी.
अंत्यविधीसाठी उपस्थितीची कुठलीही मर्यादा नाही.
सभा आणि निवडणुकांसाठी 50 टक्क्यांच्या उपस्थितीच मर्यादा असेल.
बांधकाम, कृषी, ई-कॉमर्स हे नियमित सुरू राहतील.
सार्वजनिक वाहनं 100 टक्के क्षमतेने चालतील.
जमावबंदी लागू राहील.
तिसऱ्या स्तरासाठी हे नियम :
अत्यावश्यक सेवेतील दुकानं रोज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत सुरू राहतील.
मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह बंद राहतील.
रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत 50 टक्क्यांच्या क्षमतेनं उघडीतल. त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहील.
लोकल ट्रेन केवळ वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा आणि महिलांसाठी सुरु राहील. DMA आवश्यकेतनुसार निर्णय घेतील.
सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत रोज सुरु राहतील.
खासगी कार्यालयं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत सुरू ठेवता येतील.
सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीत, खासगी कार्यलायांनाही हीच अट लागू.
विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9, संध्याकाळी 6 ते रात्री 9 ही वेळ असेल.
चित्रिकरणासाठी बयो-बबल बंधनकारक. संध्याकाळी 5 नंतर परवानगी नाही.
सामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना संध्याकाळी 4 पर्यंत 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
लग्न समारंभात 50 लोक जण उपस्थित राहू शकतात.
अंत्यविधीला 20 लोक उपस्थित राहू शकतात.
सभा आणि निवडणुकांना 50 टक्क्यांची मर्यादा.
बांधकाम साईटवर उपस्थित कामगारांद्वारे काम सुरू ठेवता येईल. मात्र दुपारी 4 नंतर बंद करावं लागेल.
ई-कॉमर्स नियमित सुरू राहील.
कृषी क्षेत्राचं काम रोज संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहील.
सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेनं सुरू राहील.
जमावबंदी संध्याकाळी 5 पर्यंत, तर संचारबंधी संध्याकी 5 नंतर लागू असेल.
चौथ्या स्तरासाठी हे नियम :
अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील
सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील
शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती
विविध खेळ (आऊटडोअर) सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही
लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक
राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील
ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील
कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.
ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही
संचारबंदीचे नियम लागू राहतील
पाचव्या स्तरात अद्याप एकही जिल्हा नाहीय.
कोणता जिल्हा कोणत्या स्तरात येतो?
आता आपण कोणता जिल्हा कोणत्या स्तरात येतो, ते पाहू. या जिल्ह्यांना स्तरनिहाय वेगवेगळे नियम लागू होतील.