महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची अखेर सुटका करण्यात आली

रविवार, 16 जानेवारी 2022 (12:35 IST)
रायफल बटालियनच्या सैन्याच्या भरती परीक्षेसाठी आसामला गेलेल्या कोल्हापूर आणि पुण्यातील तब्बल 60 विद्यार्थींना सक्तीने आयसोलेट करण्यात आले होते.त्यांनी स्वतःची सुटका करण्यासाठी राज्य प्रशासनाला कळविले होते.  त्यानंतर राज्यप्रशासन ने दखल घेत त्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यामुळे आता आसाम मधील त्या सर्व विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली असून ते लवकरच राज्यात येण्याचे सांगितले आहे. त्यासाठी त्यांना सुखरूप आणण्यासाठी सगळी व्यवस्था तातडीने करण्याचा सूचना अजित पवार यांनी दिल्या.
ट्रेंडमॅन पदासाठी 12 ते 18 जानेवारी पर्यंत ही  परीक्षा होणार होती. या साठी हे 60 विद्यार्थी आसाम ला पोहोचले होते. तिथे गेल्यावर या विद्यार्थींची कोरोना चाचणी ण घेता त्यांना आयसोलेट करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहता ही परीक्षा रद्द करण्यात आली. आसाम सरकार ने या मुलांना आता सोडले असून आज रेल्वेने महाराष्ट्रात येणार आहेत. 
  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती