Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

गुरूवार, 30 जून 2022 (19:56 IST)
गेल्या आठवडाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीला आज अनपेक्षित वळण मिळाले आहे. सर्व अंदाज धुडकावून लावत, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना आपल्या आमदारांचा पाठिंबा जाहीर केला. सगळीकडे पैज चालू झाली. भाजपच्या काही लोकांनाही याची कल्पना नव्हती. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, असे सर्वजण गृहीत धरत होते, मात्र या दिशेने राजकीय कुरघोडी होईल, हे अनपेक्षित होते. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती