बारावीचा निकाल : पुन्हा एकदा मुलींची बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या (एचएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ही सर्व माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आणि निकाल घोषित केला. यावेळी बारावीचा 88.41 टक्के निकाल लागला असून, मुलींनीच पुन्हा बाजी मारली आहे. तब्बल 92.36 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून 85.24 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.
या निकालात कोकण विभागाने यंदाही आपली आघाडी आहे. कोकण विभागातील तब्बल 94.85 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर सर्वात कमी निकाल (86.13 टक्के) नाशिक विभागाचा लागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान ही परीक्षा झाली. राज्यातील सुमारे नऊ हजार 486 कनिष्ठ महाविद्यालयांतून परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्यात 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यात आठ लाख 34 हजार 234 विद्यार्थी, तर सहा लाख 50 हजार 898 विद्यार्थिनींचा समावेश होता.
शाखानिहाय निकालाची टक्केवारी...
विज्ञान शाखा- 95.85 टक्के
कला शाखा- 78.93 टक्के
वाणिज्य शाखा- 89.50 टक्के
व्यावसायिक अभ्यासक्रम शाखा- 82.18 टक्के
अपंग विद्यार्थ्यांचा निकाल- 91.78 टक्के
कोकण- 94.85 टक्के
कोल्हापूर- 91 टक्के
औरंगाबाद- 88.74 टक्के
पुणे- 89.58 टक्के
नागपूर- 87.57 टक्के
लातूर- 88.31 टक्के
मुंबई- 87.44 टक्के
अमरावती- 88.08 टक्के
नाशिक- 86 .13 टक्के.